सारथी महाराष्ट्राचा प्रतिनिधी _
चक्क गायीच्या पोटातून निघाला प्लॅस्टिकचा गोळा..
सविस्तर वृत्त असे की, चासनळी ,ता कोपरगाव येथील रहिवासी पशुपालक -संतोष शिवराम शिंदे यांची एक तिसऱ्या वेताची संकरित गाय एकाकी चारा वैरण खाण्यास बंद पडली असता त्यांनी १)पशुवैद्यकीय अधिकारी- डॉ . मानसिंग सिसोदे व श्री.अमित गाडे तसेच सोबत श्रीकर शाहीर यांच्याशी संपर्क साधून गायीची तपासणी व उपचारादरम्यान गायीच्या पोटामध्ये काहीतरी प्लॅस्टिक अथवा धातूची वस्तू असल्याचे त्यांना आढळून आले ,
व त्यांनी पोटाचे शस्त्रक्रिया करण्याचे तातडीने निर्णय घेतला असता पशुपालक शिंदे यांनी क्षणाचा विलंब न करता ऑपरेशनचे सर्व तयारी केली,
संकरित गायीचे सदरील ऑपरेशन (शस्त्रक्रिया)दरम्यान पोटामध्ये प्लॅस्टिकच्या दोऱ्यापासून झालेला गोळा बाहेर काढण्यात आला. व संकरित गाईचे प्राण वाचले व पशुपालकाला समाधान मिळाले.


Discussion about this post