श्रीगोंदा जामखेड रोडवर तालुक्यातील आढळगाव येथील डोकेवाडी काल सायंकाळी सहा ते साडेसहा वाजण्याच्या दरम्यान दोन दुचाकी समोरा समोर धडकून झालेल्या अपघातात दोन्ही दुचाकी स्वारांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून यातील एक मयत व्यक्ती हे बेलवंडी येथील असून त्यांची ओळख पटली आहे तर दुसरे मयत दुचाकीस्वार बीड जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे
अपघातात मृत पावलेल्या दोन्ही दुचाकीस्वारांचे वय अंदाजे ४०ते४५ वर्षे असल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे ओव्हरटॅक करण्याच्या नादात या दुचाकी समोरा समोर धडकल्याची माहिती समजली आहे अपघात एवढा भयंकर होता की या दोन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
Discussion about this post