पुसद: शहराचा मध्यभाग असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक ५२ वर्षीय इसम रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे दुर्दैवी घटना घडली आहे पायदळ चाललेल्या व्यक्तींला आपला जीव गमवावा लागला आहे
एका पाठोपात एक होणाऱ्या रस्ते अपघातामुळे आणि एकाच ठिकाणी होत असलेल्या रस्ते अपघातामुळे मात्र वाहतूक व्यवस्थेच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे .
सविस्तर बातमी अशी की आज दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी दुपारी अंदाजे सव्वा दोन ते अडीच वाजताच्या दरम्यान पुसद शहराच्या मध्यभाग असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका ५२ वर्ष इसमाच्या डोक्यावरून व अंगावरून क्रेन गेल्याने इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला सदर इसमाची ओळख पटली असून तो मांडवा येथील रहिवासी असल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे त्याचे नाव नारायण मधुकर कापसे वय ५२ वर्ष राहणार मांडवा असे असून ते पंचायत समिती पुसद येथे घरकुल कामासाठी आले असल्याची माहिती मिळाली आहे.
Discussion about this post