तालुक्यातील वैजापूर, खंडाळा, घायगाव, गारज, लासुरगाव, बोरसर, बाबतरा, नागमठाण, महालगाव, शिऊर, लोणी खुर्द आणि जानेफळ अशा बारा मंडळ अधिकारी स्तरावर ही फेरफार अदालत होणार आहे. ज्या नागरिकांचे प्रलंबित फेरफार असतील त्यांनी वरील ठिकाणी आवश्यक त्या अभिलेख्यांसह उपस्थित रहावे असे आवाहन तहसिलदार सुनील सावंत यांनी
तहसिलदार सावंत म्हणाले, तालुक्यात फेरफार प्रलंबित असल्याचे दिसुन आले आहे. त्यामुळे प्रलंबित फेरफार प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले आहेत. त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला असुन त्यानुसार सात ते नऊ जानेवारी दरम्यान तहसिलदार यांनी त्यांच्या अधिनस्त मंडळ निहाय प्रलंबित फेरफार प्रकरणांचा आढावा घेणे, नऊ ते दहा जानेवारी दुय्यम निबंधक यांच्याशी चर्चा करुन त्यांनी पाठवलेल्या खरेदी विक्री व्यवहाराचा आढावा घेणे त्याचप्रमाणे १३ जानेवारी रोजी फेरफार अदालतीचे आयोजन करुन संबंधितांना कळवणे व १५ जानेवारी रोजी प्रत्यक्ष फेरफार अदालत घेऊन प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे असे नियोजन करण्यात आल्याची माहिती तहसिलदार सावंत यांनी दिली
Discussion about this post