. प्रतिनिधी एरंडोल- येथील माहिती अधिकार कार्यकर्त्याने मागितलेल्या माहितीनुसार सामाजिक वनीकरण विभाग जळगाव यांनी आपल्या कामात दिरंगाई केली या प्रकरणी नितीन रघुनाथ पाटील यांच्या सेवा पुस्तकात सक्त ताकीद नोंद करण्याचे आदेश सामाजिक वनीकरण विभाग जळगाव यांनी दिले आहे या कारवाईमुळे शासकीय कर्मचारी गटात खळबळ उडाली आहे.
एरंडोल येथील माहिती अधिकार कार्यकर्ते राजधर महाजन यांनी सामाजिक वनीकरण विभाग एरंडोल यांच्याकडे माहिती मागितली असता सदर माहिती अपूर्ण माहिती त्यांना देण्यात आली .
म्हणून महाजन यांनी प्रथम अपील सामाजिक वनीकरण विभाग जळगाव यांच्याकडे दाखल केले परंतु या अधिकारी यांनी सुनावणी न घेतल्यामुळे द्वितीय अपील राज्य माहिती आयोग नाशिक यांच्याकडे करण्यात आले.
त्यांनी आदेश पारित करून आपल्या अधिकारी एस.वाय. शेख यांच्यावर शासन परिपत्रकाप्रमाणे प्रथम अपिलावर सुनावणी न घेऊन आदेश पारित न केल्याने अधिनियमातील कलम १९(६) शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग मधील तरतुदीचा भंग केला असल्याचे खातर जमा झाल्यास सत्तर जमा झाले त्यांच्याविरुद्ध तरतुदीनुसार कार्यवाही करावी असे आदेश पारित केले.
त्यानुसार प्रथम अपिलीय अधिकारी एस.वाय. शेख यांची मुख्य वन रक्षक सामाजिक वनीकरण नाशिक गजेंद्र हिरे यांनी चौकशी केली. चौकशी अंती लिपिक नितीन पाटील यांच्यावर ठपका ठेवून शिस्त भंगाचे कारवाई केल्याचे निदर्शनास आले.
महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील कलम १० अन्वये शिक्षा न देता त्यांना प्रधान मुख्य वन रक्षक सामाजिक वनीकरण म.रा. पुणे अन्वये राज्य माहिती आयोग नाशिक खंडपीठ यांनी पारित केलेल्या आदेशान्वये लिपिक नितीन पाटील सामाजिक वनीकरण विभाग जळगाव यांना शासकीय कामात दिरंगाई केल्यामुळे त्यांच्या सक्त सेवा पुस्तिकीय ताकीद देण्यात यावी असे आदेश शिस्तभंग विषयक प्राधिकारी तथा विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग जळगाव सं.वि. पाटील यांनी दिले आहे.
Discussion about this post