केंद्रशाळा मांडेदुर्ग मध्ये कार्यानुभव विषयांतर्गत विद्यार्थ्यांच्या क्रियाशीलतेला वाव देण्यासाठी आज शुक्रवार, दि. 17/01/2025 रोजी वनभोजनाच्या निमित्ताने इ. 5 वी ते 7 वी च्या विद्यार्थिनींसाठी “माझी भाकरी” हा उपक्रम व स्पर्धा राबविण्यात आली.

यासाठी 5-5 विद्यार्थिनींचे गट करण्यात आले. पाणी, तवा, पीठ, परात, उलथाने, भांडी, लाकडे यांची गटवार जमवाजमव करून नियोजन केले. दगडांची चूल मांडणे, सरपण जमा करणे, ते व्यवस्थित चुलीत लावणे, चूल पेटवणे, पीठ मळणे, तव्यावर भाकरी भाजणे अशा सर्व गोष्टीचा ताळमेळ घालून आज विद्यार्थिनींनी उत्साही वातावरणात भाकरी बनविल्या. सर्वच विद्यार्थिनींनी सुंदर भाकरी बनविल्या.

या उपक्रमासाठी खूप सुंदर प्रतिसाद मिळाला. हाताला चटके सोसत आईच्या भाकरी बनविण्याच्या कष्टाची अनुभूती या सगळ्याना आली. सर्वांचे कौतुक झाले. यामधून अनुक्रमे तीन क्रमांक काढण्यात आले.

तसेच बाकी विद्यार्थ्यांनी वनभोजनासाठी लागणारे साहित्य जमवाजमव व स्वयंपाक बनविण्यासाठी मदत केली. सर्वांनी आनंदी वातावरणात वनभोजनाचा आस्वाद घेतला.याकरीता पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था श्री.सखाराम केरुडकर यांनी केली.

यासाठी शाळेतील मुख्याध्यापक, नाईक सर ,सर्व शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन कमिटी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
Discussion about this post