सांगली संस्थानचे भूतपूर्व अधिपती विजयसिंह राजे पटवर्धन यांनी सांगली मध्ये येताच संस्थानच्या जागा चांगल्या कामासाठी वापरता याव्यात यासाठी शासनाला देऊ केल्या आजमितीस संस्थानच्या छोट्या मोठ्या ऐतिहासिक वास्तू सांगली मिरज शहरांमध्ये दिसून येतात. शासनाने देश स्वतंत्र झाल्यावर शासकीय कामाच्या वापरासाठी संस्थानच्या जागा घेतल्या होत्या मात्र आत त्या संस्थानला पार्ट कराव्यात अशा आशयाचे पत्र गणपती पंचायतन संस्थानचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधींशी बोलताना ते म्हणाले कि तत्कालीन संस्थानचे अधिपती श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन यांच्याकडे सरकारने संस्थानच्या जागा शासकीय कार्यालयांसाठी भाडेतत्वावर मागितल्या होत्या त्याप्रमाणे आम्ही त्या दिल्याहि त्याप्रमाणे खाजगी राजवाडा भूमापन कार्यालय जुने जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, जुने न्यायालय, सेतू कार्यालय, रजिस्ट्रार कार्यालय आदी च्या वापरासाठी अत्यंत अल्प दरामध्ये आम्ही भाडेतत्वावर देऊ केल्या होत्या मात्र सरकारी कार्यालये बांधल्यावर परत या वास्तूंचा ताबा संस्थानला मिळावा हि अशी अटही होती. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय आता विजयनगर येथील नव्या वस्तू मध्ये स्तलांतरित झाले आहे. उर्वरित कार्यालये हि शासनाच्या जागेमध्ये स्थलांतरित होत आहेत मात्र जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत अद्यापही जुन्या कार्यालय वास्तूची हस्तांतर प्रक्रिया केली गेली नाही. उलट आमच्या जागांची दुरावस्थाच शासनाकडून केली गेली. ते पुढे म्हणाले या सर्व प्रकारामुळे श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन हे व्यथित असून या संस्थानकालीन इमारती म्हणजे सांगलीचा अमूल्य ठेवा आहे. मात्र शासनाने या वास्तूचा वापर फक्त कामासाठी केलाय या परिसरातील स्वच्छता किंवा डागडुजी करण्याची साधी तसदीही घेतली गेली नसल्याने राजे विजयसिंह पटवर्धन यांनी वेळोवेळी तशी खंतही व्यक्त केली आहे. भविष्यामध्ये या वास्तुमुळे काही जीवित किंवा वित्त हानी झाल्यास संस्थान त्यास जबाबदार असणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलंय.
Discussion about this post