किल्ले पारगड पाणी प्रश्न अधांतरीच; तीन वर्षे केवळ टोलवाटोलवी, ग्रामस्थांचे हाल, आमरण उपोषणाचा इशारा…
प्रतिनिधी: चंदगड, आजरा.
अजिंक्य किल्ले पारगडचा पाण्याचा प्रश्न तीन वर्षे झाली तरी तो पुन्हा अधांतरीच राहिला आहे. पाण्यासाठी गडावर ठणठणाट आहे. अधिकाऱ्यांची दिरंगाई आणि टोलवाटोलवी यांच्या कचाट्यात पारगड पाणी प्रश्न रेंगाळत आहे. याचा त्रास पारगड येथे रहाणाऱ्या ग्रामस्थाना सहन करावा लागतो. फेब्रुवारी अखेर काम पूर्ण न झालेस आमरण उपोषण करणेचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
गत १५ ते २० वर्षापर्यत गडावरील गुंजन, फाटक, गणेश तलाव, आणि तीन विहीरी याचे पाणी रहिवाशांना पुरत होते. अलिकडच्या कालावधीत रस्ते सुधारणा झालेमुळे पर्यटकांची वर्दळ पूर्वी पेक्षा अधिक वाढत गेली परिणामी पाण्याचा वापर अधिक होत गेला. फेब्रुवारी अखेर सर्व तलाव व विहीरी कोरड्या पडतात. मार्च नंतर पाण्यासाठी तीन महीने वणवण करावी लागते. या पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार यांनी ग्रामस्थांसह चंदगड पंचायत समिती समोर १ मार्च २०२ ३ रोजी आमरण उपोषण केले होते. यावेळी पाणीपुरवठा विभाग अधिकारी ८८ लाख ५६ हजार रुपये मंजुरीची वर्कऑर्डर देवून उपोषण थांबविले होते या कामी आता निवडून आलेले आमदार भाजप नेते शिवाजी भाऊ पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.
आता शिवाजी पाटील हे आमदार झालेमुळे पारगड ग्रामस्थांनी पाणी प्रश्न सोडवणूक करतील अशी आशा पल्लवीत झाली आहे. नळ पाणी पुरवठा योजनेचे काम बहुतांशी पूर्ण झाले आहे. यासाठी लोकसहभाग म्हणून ६० हजार रुपये ग्रामस्थांनी भरली आहे. ठेकेदाराने वेळेत बिले अदा केलेली नाहीत. त्यामुळे ठेकेदाराकडून कामाच्या पूर्ततेचा उत्साह नाही. मा. आमदार शिवाजीभाऊ पाटील यांनी मा. जिल्हाधिकारी यांच्याशी चंदगड तालुक्यात बैठकीचे आयोजन केले आहे. यावेळी रेंगाळलेली प्रश्न तात्काळ सोडविले जातील अशी आमदारांच्या कडून अपेक्षा आहे.
तथापी फेब्रुवारी अखेर गडावर पाणी न आल्यास १ मार्च २० २५ पासून पंचायत समिती चंदगड कार्यालया समोर पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. रघुवीर शेलार यांच्यासह पारगड येथील प्रकाश चिरमुरे, विठ्ठल शिंदे, सुनिल मालुसरे, संभाजी जांभळे आदीनी दिला आहे.
Discussion about this post