उदगीर /प्रतिनिधी :उदगीर येथील पशुवैद्यक महाविद्यालयात आयोजित माफसू नागपूर आणि माविम मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसीय शेळीपालन प्रशिक्षणाचा समारोप झाला आहे.तरी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता डाॅ. नंदकुमार गायकवाड(पाटील) होते.आभासी पध्दतीने प्रकल्प प्रमुख तथा विस्तार संचालक डाॅ.अनिल भिकाने,प्रकल्प समन्वयक डाॅ.धनंजय देशमुख,प्रकल्प सह-समन्वयक डाॅ.शरद आव्हाड,प्रशिक्षण सह-समन्वयक डाॅ. राम कुलकर्णी आणि प्रशिक्षण सहायक प्रकाश मगर हे उपस्थित होते.
महिलांचा सहभाग
महिला सक्षमीकरणाच्या उद्दिष्टाने आयोजित या प्रशिक्षणात नांदेड जिल्ह्य़ातील १७ पशुसखी महिलांनी सहभाग घेतला होता.प्रशिक्षण यशस्वीरितया पुर्ण करणाऱ्या पशुसखीना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.सुनंदा घडलिंगे,प्रियंका हनुमंते,साधना डाके,जिजाबाई वैद्य,संगीता प्रेमलवाड आणि मीना सुर्यवंशी या पशुसखींनी प्रशिक्षण घेतले.प्रशिक्षणाच्या यशस्वितेसाठी डाॅ.अय्यान पाटील,डाॅ.वेदांत पांडे,यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक डाॅ.नरेंद्र खोडे यांनी तर सुञसंचालन डाॅ.सुहासिनी हजारे यांनी केले.आभार प्रदर्शन डाॅ.संकेत नरवाडे यांनी मानले.
Discussion about this post