उदगीर / कमलाकर मुळे : उज्ज्वल ग्रामीण महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमानेवाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम या अंतर्गत महाविद्यालयातील ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या प्रसिध्द ग्रंथाचे ग्रंथ प्रदर्शन घेण्यात आले.
ग्रंथ खूप मौल्यवान आहेत.त्यांचा पुरेपुर वापर करून विद्यार्थांनी आपले भविष्य उज्ज्वल करून घ्यावे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध ग्रंथाचे ग्रंथ प्रदर्शनाचे प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक भानुदास गायकवाड यांनी केले.या ग्रंथ प्रदर्शनाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.सदानंद गोणे हे होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल विजयानंद मोठेराव यांनी केले आणि आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डाॅ.संजय तोडकर यांनी व्यक्त केले.या प्रदर्शनास महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक ,शिक्षकेत्तर कर्मचारी,उज्ज्वल माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद,रा.से. यो.स्वयंसेवक,महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यालयातील विद्यार्थांचा सहभाग नोंदविला.
Discussion about this post