
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या युवा महोत्सवात ग्रामगीता महाविद्यालयाची उंच “भरारी” गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे
दि. 3 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान “युवा महोत्सव-2024-25” आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवामध्ये ग्रामगीता महाविद्यालयातील एकूण ३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या महोत्सवामध्ये ग्रामगीता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्थळचित्र, प्रहसन, एकांकिका व वेस्टर्न ग्रुप सॉंग या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तसेच शास्त्रीय ताण वाद्य, नकला, लोकनृत्य व वेस्टर्न सोलो सांग यामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला व मूकनाट्य, समूहगीत, शास्त्रीय ताल वाद्य व व्यंगचित्र या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. सोबतच नाटक या कलाप्रकारचे सर्वसाधारण विजेते सहित गोंडवाना विद्यापीठाच्या सांस्कृतिक महोत्सवाचे सर्वसाधारण उपविजेते पद महाविद्यालयाने पटकविले.विजेत्या संघांमध्ये साक्षी कौरासे, गौरव मेश्राम, सविता नन्नावरे,वैभव बारेकर, सार्थक डेंगे, निकेश बारेकर, रोशन दडमल, दिलराजसिंग अंधरेले, मुकेश भिमटे, प्रतीक्षा मेश्राम, इशिका मेश्राम, किशोरी ठोंबरे, रिया वारकर, धनश्री गायधनी,जगदीपसिंग अंधरेले,चांदणी शेंदरे, जागृती बनकर, उर्वशी राऊत, समीक्षा बरडे, गुरुदेव सूर्यवंशी व अन्य विद्यार्थ्यांचे ग्रामगीता महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनंदा आस्वले यांनी अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेकरिता प्रा.डॉ. सुमेध वावरे-विद्यार्थी विकास विभाग प्रमुख, प्रशिक्षक प्रा.सचिन भरडे, प्रा. प्रज्ञा खोब्रागडे व प्रा. निशा चौधरी यांनी परिश्रम घेतले. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले.
Discussion about this post