
मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे..
मानोरा :-
तालुक्यातील वरोली येथे दि. ९ मार्च रोजी गतिरोधक खोदण्यास मनाई केल्याने ९ जणांनी मला, दिव्यांग वडील, आई व भावाला लाकडी पट्टीने मारहाण केली. अश्या आशयाची फिर्याद वैभव दिलीप खडसे यांनी दिल्यावरून आरोपीविरुद्ध पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
रस्त्यावर बैलगाडी उभी करून रोडवरील गतिरोधक फोडले.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी खुशाल बाबाराव बोराडे यांनी त्याच्या घराजवळील रस्त्यावर बैलगाडी उभी करून रोडवरील गतिरोधक फोडले. फिर्यादी वैभव खडसे यांनी रात्रीच्या वेळी त्याची दुरुस्ती केली. मात्र दुसऱ्या दिवशी आरोपींनी पुन्हा गतिरोधक खोदण्यास सुरुवात केली. तेंव्हा फिर्यादीने मनाई केली असता आरोपीं व त्याच्या आठ साथीदारांनी रागाच्या भरात शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी खुशाल बाबाराव बोराडे, पुष्पा खुशाल बोराडे, अश्विनी खुशाल बोराडे, अजय खुशाल बोराडे, गजानन फकीर बोराडे, रेखा गजानन बोराडे, शुभम गजानन बोराडे, महेश गजानन बोराडे, गोपाल खुशाल बोराडे आदीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे..
Discussion about this post