हंडीनिमगाव : नेवासा तालुक्यातील हंडीनिमगाव येथे कृषि महाविद्यालय सोनई च्या कृषिदूतांनी ग्रामीण कृषि जागरूकता व कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत प्लांट क्लिनिकचा उपक्रम राबविला. यामध्ये या भागात आढळलेले विविध रोग, कीड, अन्नद्रव्यांची कमतरते असलेले नमुने तसेच विविध गवतांचे नमुने शेतकऱ्यांना याप्रसंगी दाखवण्यात आले व त्यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास कृषि महाविद्यालयाचे मृदशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. जे एम वाघमारे व वनस्पती रोगशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. एस एस हुरुळे, सरपंच भिवाजीराव आघाव, गावातील प्रगतशील शेतकरी संदीप जावळे, बाळासाहेब पिसाळ, बाळासाहेब जाधव, कुणाल पिसाळ, रमेश पिसाळ, साहेबराव भनगे, गोरख गुंजाळ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कृषिदूतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच जी मोरे, उपप्राचार्य प्रा. एस व्ही बोरुडे, कार्यक्रम समन्वयक डॉ. ए ए दरंदले कार्यक्रम अधिकारी प्रा. जे एम वाघमारे, प्रा. आर एस गोंधळी व विशेषज्ञ डॉ. वाय एम गागरे, प्रा.एन एन दहातोंडे यांचे मार्गदर्शन लाभले. कृषिदूत प्रणव पाचारणे, सुमित निकुम, कौस्तुभ वाडीले, तेजस शेळके, उज्वल पाटील यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला
Discussion about this post