

प्रशांत टेके पाटील /कोपरगाव तालुका प्रतिनिधी – निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराजांना श्री क्षेत्र प्रयागराज येथे जागतिक पातळीवर गर्दीचा वर्ड रेकॉर्ड झालेल्या तपस्वी साधूसंताच्या महाकुंभ मेळ्यात शंभूपंच दशनाम जुन्या आखाड्याच्या वतीने पिठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंदगिरी महाराजांच्या हस्ते जगद्गुरु ही उपाधी बहाल करण्यात आली. महाराष्ट्रातील जगद्गुरु पदवी मिळविणारे महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज हे पहिले एकमेव संत ठरले आहे. दि.२० फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता श्री क्षेत्र कोपरगाव शहरात जगद्गुरु महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराजांची भव्य दिव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.ठिक ११ ते १२ या दरम्यान बाबाजीचे पाद्रपुजन करण्यात येईल. त्यानंतर भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन कोपरगाव तालुका जय बाबाजी भक्त परिवाराकडून करण्यात आले आहे..
Discussion about this post