निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचा श्रीक्षेत्र प्रयागराज महाकुंभमेळ्यात ‘जगद्गुरु’ पट्टाभिषेक झाल्याबद्दल श्री क्षेत्र कोपरगाव येथे भव्य स्वागत व पूजन करण्यात आले. यावेळी गोदावरी नदीचे शेकडो जोडप्यांच्या उपस्थितीत गंगापूजन करून भव्य शोभायात्रा कोपरगाव शहरात काढण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर साईबाबा तपोभूमी येथील सभागृहात भव्य सत्संग सोहळा पार पडला.
Discussion about this post