सारथी महाराष्ट्राचा वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची छत्रपती संभाजीनगर शासकीय विश्रामगृह येथे संस्थापक अध्यक्ष राजा माने साहेब,राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत, राज्य समन्वयक इकबाल शेख पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले ,जिल्हाध्यक्ष रमेश नेटके, अमोल अळंजकर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली त्यामध्ये संभाजीनगर, वैजापूर, गंगापूर, पैठण, कन्नड, खुलताबाद,या तालुक्यातील कार्यकारणी समिती स्थापन करण्यात आली.
त्यांच्या हस्ते सर्व कार्यकारणी सदस्य अध्यक्ष यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
वैजापूर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी भारत पाटील सोनवणे, उपाध्यक्षपदी अनिल सूर्यवंशी, कार्याध्यक्षपदी अर्जुन शिंदे, सचिव पदी बाबासाहेब गाणार, सहसचिव पदी अक्षय ठोंबरे, कोषाध्यक्ष मोहन आखाडे, तालुका संघटक पदी संतोष जाधव जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप गायके यांची निवड करण्यात आली.
Discussion about this post