भारतीय मराठा महासंघाच्या वतीने येरवडा कारागृहात रक्षाबंधन
*दौंड तालुका प्रतिनिधी* -ता.२१ऑगस्ट आज
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने दुपारी साडेतीन वाजता येरवडा कारागृहात रक्षाबंधन कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते .
*कारागृह अधीक्षक यांनी माहिती दिली*
येरवडा कारागृह अधीक्षक हेमंत पाटील साहेब यांना राखी बांधून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली . येरवडा कारागृहातील कैद्यां बद्दल माहिती सांगत असताना कैद्यांच्या आचार विचारात आमुलाग्र बदल झाल्याचे हेमंत पाटील साहेबांनी सांगितले .
*अखिल भारतीय मराठा महा संघाने जपली सामाजिक बांधिलकी*
सामाजिक बांधिलकी म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल पाटील साहेबांनी कौतुक केले , कारागृहाच्या वतीने आभार मानले . कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बांधवांच्या भावना समजावुन घेऊन महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सौ. रेखाताई कोंडे म्हणाल्या की आपण कारागृहातुन लवकर बाहेर पडुन आपले पुढील आयुष्य सुखासमाधानाने जावो हीच आपल्या बहीणीची मनोभावना आहे . शिवसेना पदाधिकारी सौ. अमृत पठारे यांनी बोलताना सांगितले की आम्ही आपल्याला एका प्रेमळ बहिणीच्या भावनेतून रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .
*हेमंत पाटलांचे मोलाचं सहकार्य*
येरवडा कारागृहात रक्षाबंधन कार्यक्रमाला परवानगी देत कारागृह अधीक्षक हेमंत पाटील साहेबांनी खुप सहकार्य केल्याचे सांगुन कारागृह प्रशासनाचे आभार राज्य संपर्क प्रमुख अनिल ताडगे यांनी मानले . यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सौ. जयश्री ताई साळुंखे , सौ.सविता ताई म्हस्के , सौ.शितल फडतरे , सौ.प्रमिला ताई यादव , सौ आशाताई कुंजीर यांनी कारागृहात राख्या बांधल्या. यावेळी शहर सरचिटणीस मयुर गुजर , शहर उपाध्यक्ष अभिजित ताठे , संजय ताठे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते . यावेळी मराठा महासभेचे जगजीवन काळे उपस्थित होते .
*प्रतिनिधी-कानिफनाथ मांडगे ९८९०९५४१३२*
Discussion about this post