शैलेश मोटघरे
गोंडऊमरी/रेल्वे : येथील न्यू माॅडर्न इंग्लिश कॅन्व्हेट तथा लावण्या पब्लिक स्कूलच्या गुरुजनांनी विद्यार्थ्यांचा शालेय उपक्रम अंतर्गत अभ्यास दौरा ‘मुख्ममंत्री माझी शाळा सुंदर शाळा ‘ या उपक्रमांतर्गत तालुक्यात प्रथम क्रमांक आलेल्या जि.प.प्राथमिक शाळा झाडगाव,शिवणीबांध व सहानगड किल्ला सानगडी येथे नुकतीच भेट दिली. यावेळी झाडगाव जि.प.शाळेचे मुख्याध्यापक चाचेरे यांनी परसबाग मधील विविध फुलझाडे यांची माहिती दिली.यानंतर विद्यार्थ्यांसाठी राबवत असलेले विविध उपक्रम यामध्ये शाळापूर्व तयारी मेळावा, शाळा आणि वर्ग सजावट, शालेय रंगरंगोटी, वृक्षारोपण आणि जोपासना, विद्यार्थी बचत बँक, प्लास्टिक मुक्त शाळा तसेच इतर उपक्रमांची माहिती दिली.शाळेतील सर्व शिक्षकवृंदानी चिमुकल्या विद्यार्थ्यांना शालेय जीवनात शिस्त खूप महत्त्वाची आहे हे मार्गदर्शनातून पटवून दिले.त्यानंतर सानगडीच्या सहानगडवर पोहचून सर्व पाॅईट्स दाखवून मुलांना माहिती दिली.शेवटी शिवणीबांध जलाशय दाखविण्यात आले.तेथील निसर्गाची किमया डोंगर दरी,झाडे, पक्षी याबाबत अनेक प्रश्न मुलांनी विचारुन त्यांचे निरसन करून घेतले.संध्याकाळी गाडी मध्ये गाणी म्हणत नृत्य करत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी धमाल केली.अभ्यास दौरा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव दिलीप रामटेके, मुख्याध्यापिका रुपाली येडे, शिक्षिका लिना चांदेवार, सविता गहाणे, शुभांगी डोंगरे, ममता रामटेके, सचिन रामटेके यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Discussion about this post