- संत सेवालाल महाराज यांच्या जीवन लिला चरित्र वाचन सप्ताहाची समाप्ती.
प्रतिनिधी:- रमेश राठोड
आर्णी तालुक्यातील साखरातांडा येथे दरवर्षी प्रमाणे संत सेवालाल महाराज यांच्या जयंती पासून ग्रंथ वाचन सप्ताहाची सुरवात केली जाते. दि. १५/०२/२०२५ते२१/०२/२०२५पर्यंत . संत सेवालाल महाराज यांच्या ग्रंथ वाचन. ह. भ. प. कनिराम महाराज यांच्या पवित्र वाणीतून पारायण करण्यात आले. दररोज सकाळी भक्ती भावे भजन व हरीनाम घेण्यात आले. संत जन येती घरा तो च दिवाळी दसरा अशी वाख्या आहे. साखरातांडा येथे संत सेवालाल महाराज जयंती निमित्त सप्ताहाची सुरवात ४०वर्षापुर्वी पासून अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो या मध्ये गांवातील लोकांचा व भाविक भक्तांचे मोठ्या प्रमाणात योगदान राहाते. यामध्ये गावातील युवा तरुण वर्ग व प्रौढ वयाच्या व्यक्तिचा मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण होत असल्याने संत सेवालाल महाराज जयंती साजरी सार्वजनिक उत्सव साजरा केला जातो. दरवर्षी प्रमाणे महाप्रसाद व महापंगत केली जाते. या सर्व दिवशी सकाळी व संध्याकाळी हरीनाम चे गजरात दणदणीत भक्ती मय वातावरणात कसे सात दिवस गेले यांचे भान विसरून गेले असे देवाच्या नावाच्या ठिकाणी भक्त आपले सर्व गोष्टी चे भान हरपून सप्ताहाची सुरवात पासून तल्लीन झालेले होते.
Discussion about this post