
जिद्द ,मेहनत आणि सातत्य याच्या जोरावर श्रीगोंदा तालुक्यातील भावडी या गावातील संदीप माणिक पांडुळे ह्याने मोठे यश मिळवले आहे.. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२३ मध्ये झालेल्या परीक्षेत यश मिळवत त्याची महसूल सहाय्यक अधिकारी म्हणून निवड झाली आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण भावडी गावाबरोबर,श्रीगोंदा तालुक्याचा अभिमान वाढला आहे. संदीप चे वडील एक प्रगतशील शेतकरी आहेत. त्याचबरोबर या यशामध्ये बंधू पै.किरण पांडुळे यांचाही मोठा वाटा आहे. त्याचबरोबर संदीप याने कठोर परिश्रम घेतले आणि स्पर्धा परीक्षेच्या कठीण वाटेवर सातत्य ठेवत यश संपादन केले.
संदीपचे प्राथमिक शिक्षण जि. प. प्राथमिक शाळा भावडी येथे झाले. माध्यमिक शिक्षण पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय आढळगाव आणि उच्च माध्यमिक महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा, येथे पूर्ण केले. एम एस सी हि पदवी टी.सी कॉलेज बारामती येथे मिळवली. यशाबद्दल नगर दक्षिणचे खासदार माननीय श्री.निलेश लंके साहेब यांनीही शुभेच्छा दिल्या.त्याचबरोबर विविध संघटना,सर्व पत्रकार बंधू यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्याचे कौतुक केले.त्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..
Discussion about this post