आप्पासाहेब गायकवाड हायस्कूल, महागोंडमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.
आजरा: तालुका प्रतिनिधी,
आप्पासाहेब गायकवाड हायस्कूल, महागोंड येथील इयत्ता दहावी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचा शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. दिपक कांबळे सर प्रभारी मुख्याध्यापक यांनी स्वीकारले तर प्रमुख अतिथी श्री. के. बी. पोवार सर, माजी चेअरमन, मुख्याध्यापक संघ कोल्हापूर कार्यक्रमाला उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री. दिपक कांबळे सर यांनी करून दिला त्याच प्रमाणे दहावीतील विद्यार्थीनींनी आपले शाळेतील अनुभव, शिक्षणाची खरी वाटचाल आणि आलेले अनुभव आपल्या शब्दात मांडले.
प्रमुख पाहुणे श्री के.बी. पोवार सर यांनी आपले शिक्षण क्षेत्रातील अनुभव आणि परीक्षेला सामोरे जाताना काय करावे या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, परीक्षेत येणारे प्रश्न व त्यांचे गुण याकडे जाणीवपूर्वक लक्ष देवून पेपर कसा सोडवावा याचा आपणांस आलेला अनुभव करून दिला
शिक्षण घेत असताना आपणं काय करणार कोण होणार हे आत्ताच ठरविले जावे, असे अनुभव अनेक कलाकार, उद्योजक, इंजिनिअर, व्यवसायीक हे शून्यातून वर कसे आले याचे उदाहरणे देवून मागदर्शन केले, आपली शाळा याचे नाते आपण टिकवून ठेवणे आवश्यक आहे.
या कार्यक्रमासाठी श्री. प्रताप देसाईसर, घाटगे सर यांनीही मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. डि.ए. पाटीलसर यांनी केले या कार्यक्रमासाठी शाळेतील पाटीलसर, खराडे मॅडम, आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थीं उपस्थित होते.
आभार श्री. प्रताप देसाईसर यांनी मानले
Discussion about this post