
जांब/वार्ताहर..
जांब येथील राजमुद्रा फाउंडेशन तर्फे आंबागड येथे जाऊन तेथील संपूर्ण किल्ल्याची सफाई केली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत जाणता राजा संपूर्ण जग ज्याला आपला आदर्श मानतो उत्तम राज्यकर्ता छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती साजरी करण्यात आली. जांब येथील राजमुद्रा फाउंडेशनच्या तरुण मुलांनी एकत्र येऊन नवीन पद्धतीने शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. त्या उद्देशाने जांब व परिसरातील गावामधील तरुणांनी व शाळकरी मुलांनी तुमसर तालुक्यामध्ये असलेल्या आंबागड येथे जाऊन त्या ठिकाणी असलेल्या किल्ल्यावर शिवजयंती साजरी केली. तेथे जाऊन आंबागड किल्ल्याची संपूर्ण स्वच्छता केली यामध्ये परिसरातील अनेक शिवभक्तांनी सहभागी होऊन शिवजयंती साजरी करण्यात सहभाग घेतला. स्वच्छता अभियान राबविल्यानंतर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व मासाहेब जिजाऊ माता यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व माल्याअर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुष बोरकर यांनी केले. या ठिकाणी आलेल्या अनेक तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आलेल्या तरुणांनी शिवचरित्रावरती मार्गदर्शन केले. त्यामध्ये मयुर कुथे, प्रियांशू साठवणे यांनी छ.शिवाजी महाराज कसे घडले. त्यांच्यावर कशा प्रकारचे संस्कार घडले व स्वराज्याची निर्मिती कशी केली. त्याचबरोबर शिवाजी महाराजांना घडविण्यामध्ये मासाहेब जिजाऊ ची भूमिका काय होती हे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये सांगितले. व मोठ्याने शिवगर्जना घेण्यात आली. त्याचबरोबर त्या ठिकाणी ह्या शिवजयंती बद्दल सर्व युवकांना बिस्किट चे पुडे वाटप करण्यात आले. या शिवजयंती चे नियोजन जांब येथील राजमुद्रा फाउंडेशन चे सदस्य रोहीत मरकाम, हिमांशू जावळकर, अनुराग नागफासे, प्रांजल जावळकर,यश उके,निशांत जावळकर व सर्व सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे आयोजन केले होते. अशाप्रकारे किल्ल्याची सफाई करून शिवजयंती साजरी करण्यात आली..
Discussion about this post