अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधि:- वैभव फरांडे (९३५६२०४०७२)
घरकुल लाभार्थ्यांना मंजुरीपत्र व पहिल्या हप्त्याचे ऑनलाइन वितरण करण्यात आले. “सर्वांसाठी घरे” प्रदान करणे या उद्देशाने केंद्र सरकारने हाती घेतलेल्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत कर्जत तालुक्यासाठी ६ हजार २५८ घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते, त्यापैकी ६ हजार १२३ घरकुले मंजूर झाली आहेत. या लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या हप्त्याची रक्कम शनिवारी (ता. २२) ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्रात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (टप्पा-२) अंतर्गत २० लाख घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. या सर्व लाभार्थ्यांना मंजुरीपत्र देणे व त्यातील १० लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरणाचा कार्यक्रम उद्या शनिवारी (ता. २२) पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथून ऑलाईन घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. कर्जत तालुक्यांतील प्रत्येक ग्रामपंचायतीत लाभार्थ्यांना मंजुरीपत्र देण्यात आले आहेत.
प्रधानमंत्री आवास योजनेपासुन एकही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी राहिलेल्या लाभार्थ्यांचेही ३१ मार्च पर्यंत सर्वेक्षण करण्याच्या सुचना केंद्र सरकारने राज्यांना दिल्या आहेत, त्यामुळे शंभर टक्के लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी सत्तेत येण्या अगोदरही ही योजना देशात सुरू होती पण अत्यंत मर्यादित स्वरूपात असल्यामुळे या योजनेचा लाभ देशवासीयांना मिळत नव्हता, परंतु २०१४ नंतर मा. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आलेलं सरकार हे सर्वसामान्य भारतीयांच सरकार असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला नजरेसमोर ठेवून त्यांच्या हक्काच्या योजनांनाच प्राधान्य देण्याच काम केंद्र आणि राज्य सरकार कडुन या योजनेच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजुर, गोरगरीब कष्टकरी जनतेला पक्क घर बांधण्यासाठी मोठी अर्थिक मदत मिळत आहे,यावेळीच लाभार्थ्यांना घरकुलाचा पहीला हप्ता १५०००/- रूपये लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतील ९ वर्षांपूर्वी सुरू झालेली प्रधानमंत्री आवास योजना अत्यंत प्रभावीपणे राबवली गेल्यामुळे देशातील सर्वसामान्य, गोरगरीब जनतेला हक्काचा निवारा मिळाला आहे, अनेक पिढ्यांपासून चांगल्या घराची अडचण केंद्र आणि राज्य सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून दुर झाली आहे.
त्या प्रसंगी भांबोरा ग्रामपंचायत श्री सिद्धेश्वर विद्यालय भांबोरा येथे ७९ घरकुल लाभार्थ्यांना प्रमाण पात्राचे वाटप करण्यात आले, लाभार्थ्यांना सरपंच मा. सचिन जगताप, माजी उपसरपंच मा. विकास रंधवे, संदीप हिरभगत, वासुदेव गोसावी यांच्या हस्ते प्रमाण पात्राचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यमान सरपंच सौ. विद्या सचिन जगताप, उपसरपंच दिपक लोंढे, ग्रामपंचायत अधिकारी श्री. नवनाथ गोरे भाऊसाहेब, वैभव फरांडे, अजहर सय्यद, अजय रंधवे, निखिल रंधवे, अविनाश सावंत व सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Discussion about this post