
जळगाव येथून एरंडोल डेपोच्या 1.जळगाव -एरंडोल -धुळे -साक्री- नवसारी व 2. जळगाव एरंडोल धुळे नासिक,त्र्यंबकेश्वर -सिल्वासा
या दोन बसेस नियमित धावतात, व जळगाव डेपोच्याही सारख्या बसेस या मार्गे काही वेळाच्या अंतराने धावतात.
जर या बसेस 1.जळगाव -धरणगाव -अमळनेर -धुळे -साक्री नवसारी व
2.जळगाव धरणगाव अमळनेर धुळे नाशिक त्र्यंबकेश्वर -सिल्वासा या मार्गे सुरू केल्यास धरणगाव तालुक्यातील प्रवाशांना याचा लाभ होईल तसेच एसटी महामंडळास लागणाऱ्या एका टोल रकमेची बचत होईल व धरणगाव तालुक्यातील प्रवाशांना धरणगाव येथून डायरेक्ट नाशिक,त्र्यंबकेश्वर, सिल्वासा व धुळे,साक्री,नवसारी जाण्यासाठी दररोज सोय होईल वरील बसेस दररोज सकाळी 8:30 व 9.30 वाजता जळगाव येथून धावतात असे निवेदनात म्हटले आहे.
तसेच उन्हाळा सुरू होत आहे त्या अनुषंगाने धरणगाव बस स्थानकावर वॉटर फिल्टर व कुलर बसवण्यात यावे अशीही केली मागणी.
*निवेदन देताना खान्देश प्रवासी..
Discussion about this post