श्री. रमेश राठोड सावळी सदोबा
सावळी सदोबा : आर्णी तालुक्यातील येत असलेल्या सावळी सदोबा परिसरातील गौण खनिज तस्करीचे माहेरघर, अशी सावळी सदोबा परिसराची ओळख झाली आहे. या भागात प्रचंड प्रमाणात रेती, मुरुमाचे उत्खनन केले जात आहे. पैनगंगा, अडाण, अरुणावती या नदीपात्रात रेतीचा सर्रास उपसा सुरु आहे. महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे तस्कारांचे मनोबल वाढले आहे
नाममात्र रॉयल्टी भरून परिसरातील अनेक टेकडयांवरून मुरुम उत्खनन केले आत आहे. महसूल विभागाने मागील काही काळापासून कारवाईची धडक मोहीम न राबविल्याने माफियांचे फावले जात आहे. परिसरातील जवळपास ५० ते ६० किलोमीटर अंतराचे नदीपात्र नजरेआड असल्यामुळे वाळू माफियांना मोकळे रान मिळाले आहे. आर्णी येथील तहसीलदारांच्या नेतृत्वात खाली काही अवैध रेती वाहतूकदारांवर कारवाई करण्यात आली, मात्र या कारवाईचा प्रभात मर्यादित काळापुरताच राहिल्या.
रेतीचा अवैध उपसा करून वाहतूक करणारे ट्रक मुख्य मार्गावरून निर्धास्तपणे जाताना दिसत आहेत. दातोडी, वरूड, गुहा, सावळी सदोबा, माळेगाव परिसरात मोठचा प्रमाणावर मुरुम उत्खनन सुरु आहे. सरकारकगुन वाळू घाटांचे लिलाव न झाल्याने मोठ्चा प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. नागरिकांनी बांधकामाला सुरुवात केली आहे. रेतीघाट खुले होवून स्वस्तात हा माल उपलब्ध होईल, अशी अपेक्षा केली जात होती. मात्र, माटाचे लिलात झाले नाही. त्यामुळे अवाजती दरात रेतीची खरेदी करून नागरिकांना बांधकाम करावे लागत आहे. प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
रेती वाहतुकीच्या वाहनांमुळे ग्रामीण भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे आणि दयनीय अवस्था झाली आहे याकडे लक्ष देण्याची गरज आहे अशी शेतकऱ्यांची मागणी होत आहे.
Discussion about this post