
प्रा. दिलीप नाईकवाड..
तालुका प्रतिनिधी..
व्याख्याणातुन वैचारिक शिवजन्मोत्सव साजरा..
शिवजयंती हा उत्सव म्हणून गावोगाव साजरा केला गेला.ठिकठिकानी कार्यक्रमांची रेलचेल होती त्यातच शंभुराजे मित्र मंडळ, संताजी नगर मेहकर तसेच नायगांव दत्तापुर येथील तरुनांनी तालुक्यात व्याख्याणाच्या माध्यमातुन विचारांचा जागर करत शिवजन्मोत्सव साजरा केला.दोनही ठिकाणी मुख्य वक्ते म्हणुन शिवव्याख्याते पांडुरंग पाटील यांना आमंत्रित करन्यात आले होते.यावेळी अशा प्रकारचे विचारांचे जागर असनारे महापुरुषांचे जन्मोत्सव प्रत्येक ठिकाणी साजरे व्हावेत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.पुढे व्याख्यानातुन मार्गदर्शन करताना पांडुरंग पाटील म्हणाले,आज ज्याप्रकारे केवळ नाचगानं करुन जयंती उत्सव साजरे होत आहेत ती समाजासाठी विचार करायला लावनारी बाब आहे.जयंती ही उत्सव म्हणून नक्की साजरी करावी त्याबद्दल आक्षेप नाही परंतु केवळ नाचगान्यांतुन महापुरुषांचे कुठले जिवनचरित्र आपण येनार्या पिढ्यांच्या समोर मांडत आहोत हाही विचार व्हावा असे त्यांनी आवाहन केले.नायगांव गावकरी मंडळी तसेच शंभुराजे मित्र मंडळ संताजी नगर मेहकर यांनी असा विचारांचा जागर असनारा जन्मोत्सव आयोजित केला.अशाप्रकारच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल दोनही ठिकानावरील आयोजकांचे त्यांनी विशेष कौतुक केले.यावेळी मराठा सेवा संघाचे जेष्ठ मार्गदर्शक दिपक पाचरने व ता.अध्यक्ष बाहेकर सर यांनीही विचार व्यक्त केले..
Discussion about this post