- निराधारांचा आक्रोश; चार-पाच महिन्यांपासून निराधारांचे अनुदान रखडले
पांडुरंग जगताप (धारुर प्रतिनिधी)
डीबीटी च्या नावाखाली श्रावण बाळ, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे हाल होत असून मागील चार-पाच महिन्यांपासून निराधारांचे अनुदान मिळालेले नाही. लाडक्या बहिणींच्या पगारीसाठी सरकार एवढे व्यस्त आहे की निराधार योजनेकडे सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले दिसत आहे.
7 फेब्रुवारी च्या जीआर नंतर शासनाने 18 फेब्रुवारी रोजी नवीन जीआर निर्गमित करून निराधारांचे मार्च२०२५ पर्यंत चे अनुदान वाटप करण्यात यावे असे सांगितले होते परंतु अद्याप कोणाच्याही खात्यावर पैसे जमा झालेले दिसत नाहीत.
चार-पाच महिन्यांपासून अनुदान नसल्याने निराधार आर्थिक अडचणीत आले असून डीबीटी होत राहील परंतु बीम्स प्रणालीनुसार जे अनुदान वाटप होण्याचे बाकी आहे किमान ते तरी निराधारांच्या खात्यात तहसीलमार्फत लवकरात लवकर जमा करण्यात यावे अशी मागणी धारूर तालुक्यातील वृद्ध निराधार लाभार्थी करत आहेत.
लाडक्या बहिणीला तुपाशी ठेवा, पण आम्हाला उपाशी मारू नका; अशी आर्त भावना निराधार व्यक्त करत आहेत.
Discussion about this post