प्रतिनिधी:- नित्यानंद मोरे
कोल्हापूर खंडपीठासाठी गेले आठ दिवसापासून मा. माणिकराव पाटील चुयेकर हे आमरण उपोषण करत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात खंडपीठ झाल्यास याचा संपूर्ण फायदा कोल्हापूर तसेच बाजूचे इतर जिल्हे व या जिल्ह्यात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना तसेच प्रत्येक समाजातील लोकांना मान्यवरांना निश्चितच होणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात खंडपीठ झाल्यास सर्व तमाम जनतेचा सर्व सर्वसमावेशक घटकांचा वेळ व पैसा दोन्हीही वाचणार आहे. यासाठी यापूर्वी अनेक वेळा वेगवेगळ्या माध्यमातून याबाबतची मागणी संबंधित प्रशासनाला करण्यात आलेली आहे मात्र संबंधित प्रशासन या बाबीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. यासाठी मा.माणिकराव पाटील चुयेकर यांनी अमरण उपोषणाचा निर्णय घेऊन गेले आठ दिवसापासून ते कोल्हापूर खंडपीठासाठी अमरण उपोषण करीत आहेत आज त्याचा आठवा दिवस आहे त्यांच्या या उपोषणाला आज अखेरपर्यंत अनेक पक्ष संघटनांनी जाहीर पाठिंबा देखील जाहीरपणे दिलेला आहे आज या उपोषणाला कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशन यांनी देखील जाहीर पाठिंबा दिलेला आहे यावेळी बहुजन भिमसेना पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा.भारत तुकाराम मोरे पाटील तसेच कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशनचे सदस्य एडवोकेट प्रमोद दाभाडे, एडवोकेट मीना पोवार, एडवोकेट मनीषा सुतार, एडवोकेट स्मिता शिंदे, एडवोकेट सुवर्ण कांबळे एडवोकेट प्रमिला सावंत, एडवोकेट संतोष मरगज, एडवोकेट शिवराज काळे, तसेच काणसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा.दीपक दादा पाटील कर्जत रायगड यांनीही या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे.यावेळेस इतर मान्यवर सदस्यही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Discussion about this post