‘या’ दिवशी येणार लाडकी बहिण चे 1500रू. खात्यात.
राज्यातील २१ ते ६५ वर्षांपर्यंतच्या गरजू महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना जुलै २०२४ मध्ये सुरू झाली आतापर्यंत या योजनेमधून ७ हफ्ते महिलांच्या खात्यात देण्यात आले.
आता फेब्रुवारी महिन्याचा ८वा हफ्ता कधी देण्यात येणार ?
अनेक दिवसांपासून लाडक्या बहिणी आठव्या हफ्त्याची आतुरतेने वाट पाहत होत्या, अखेर सरकारकडून खुशखबर मिळाली असून आठवा हफ्ता २४ फेब्रुवारीपासून सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल. अशी माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार अर्थमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागाला यापूर्वीच पैसे ट्रान्सफर केले आहेत. हे वितरण पुढील तीन दिवस चालूच राहणार असून २४ फेब्रुवारी पर्यंत खात्यात पैसे नाही आले तर कोणीही घाबरून जाऊ नये २७ तारखेपर्यंत सर्वांचे पैसे जमा होतील.


पात्र महिलांना करावं लागणार ई-केवायसी
सर्व पात्र आणि गरजू महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी हे नवीन निकष लागू केले जाणार आहेत, ज्यात अपात्र महिलांना योजनेतून बाहेर केलं जाईल. लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना आता दरवर्षी जून महिन्यात बँकेत जाऊन ई-केवायसी करून प्रमाणपत्र घ्यावं लागणार आहे. यासाठी १ जून ते १ जुलै दरम्यान ई-केवायसी करावं लागेल.
Discussion about this post