धाराशिव जिल्ह्यात लवकरच नमो महारोजगार मेळावा-नितीन लांडगे प्रतिनीधी सुदर्शन देशमुख कळंब धाराशिव जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि मोठ्या प्रमाणावर हे तरुण नोकरीच्या शोधात पुणे, मुंबई या सारख्या मोठ्या शहराकडे आपले गाव सोडून स्थलांतरित होत आहेत, ही बाब लक्षात घेऊन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय नमो महा रोजगार मेळावा धाराशिव येथे आयोजित करावा याबद्दल शिवसेना निरीक्षक तथा युवासेना राज्य समन्वयक नितीन लांडगे निवेदन देऊन लवकरात लवकर मेळावा घ्यावा अशी विनंती केली
Discussion about this post