“रिठद ते ढोरखेडा जाणाऱ्या रस्त्याच्या कडा खचल्या व तडे ही गेले”
वाशीम -रिसोड राज्यमार्ग ५१ पासून जोडरस्ता रिठद बसस्टँड पासून ते ढोरखेडा जाणारा रस्ता ७ कि.३००मी.रिठद गावाला लागूनच असलेल्या आणि ढोरखेडा गावापर्यंत जात असलेल्या मुख्यमंत्री सडक योजनेतंर्गत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले.हा रस्ता जागोजागी खराब झाला.रसत्याच्या काही खचल्या,कोठे-कोठे तर चादर अंथरलेल्या प्रमाणे डांबरीकरण टाकण्यात आले.ते हाताने निघत आहे.तरी संबंधित ठेकेदाराने याबाबतची दखल घेऊन डांबरीकरण जेथे खराब झाले तेथे खोदकाम करून पॅचेजेस टाकुन दुरुस्ती करावी.
तिन महीनेही या कामासाठी पुर्ण होत नाहीत तोच अशी रस्त्याची दुरावस्था झाली.हि वस्तुस्थिती आहे.गेली कित्येक वर्षे झाली १९८६ पासून या गावांना जाण्यासाठी डांबरीकरण व्हावे हि जनतेला अपेक्षा होती ती पूर्ण होतांना आनंद झाला, पण त्या रस्त्याच्या कडा खचून जात आहेत.याचे दुःखही जनतेला वाटते आहे.रस्त्याची दबाई बरोबर न झाल्याने व डांबराचा पाहीजेत तसा वापर न केल्यामुळे रस्ता जागोजागी उखडून जात आहे तर काही ठिकाणी चादर अंथरलेल्या प्रमाणे रस्ता दिसत आहे.त्याची दुरुस्ती करून रस्त्याच्या बाजूने मुरुम टाकून साईड लवकर भराव्यात म्हणजे डांबरीकरण खचून जाणार नाही.
रिसोड तालुका प्रतिनिधी भागवत सरनाईक
Discussion about this post