
प्रा. दिलीप नाईकवाड,
सिंदखेडराजा : तालुका प्रतिनिधी
अकोला येथे मागच्या आठवड्यात माजी आमदार कैलासवासी तुकाराम बिडकर हे विमानतळावर भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. बावनकुळे यांची भेट घेऊन परत येत असतानां रस्त्यातच एका वाहतूक करणाऱ्या टेम्पोला त्यांच्या मोटर सायकलची जोरदार धडकून त्यांचा अपघातात मृत्यू झाला. आमदार स्वर्गीय तुकारामभाऊ बिडकर. यांचे मूर्तिजापूर व अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय व सामाजिक कार्य आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे जिल्ह्यात तसेच सर्वत्र शोककळा पसरली होती. काल विधान परिषदेचे बुलढाण्याचे आमदार धीरज भाऊ लिंगाडे यांनी अकोला या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची सांत्वन पर भेट घेतली याप्रसंगी स्वर्गीय तुकारामभाऊंच्या आठवणींना आमदारांनी उजाळा दिला. व कुटुंबीयांचे सांत्वन केले..
Discussion about this post