

प्रा. दिलीप नाईकवाड सिदंखेडराजा :तालुका प्रतिनिधी
तृण अग्नी मेळे समरस झाले|
तैसे नामें केले जपता हरि||
“तृण म्हणजे गवताला अग्नी चा स्पर्श झाल्यावर ज्याप्रमाणे अग्नी गवताला जाळून खाक करते अगदी त्याचप्रमाणे हरि नामाचा जप केल्याने पापे जळून नष्ट होतात,” असा हितोपदेश ह.भ.प.पंजाबराव बिलारी महाराज यांनी केले.ते जवळच असलेल्या मौजे पेनटाकळी येथे ता.२३ रोजी आपल्या किर्तनातून भाविकांना प्रबोधन करीत होते. जवळच असलेल्या मौजे पेनटाकळी येथे महाशिवरात्री निमित्त ता.२० पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून शिव महापुराण सोहळा आयोजित केला आहे.ता.२० पासून सूरु झालेल्या या भावभक्तीपूर्ण सोहळ्याची ता.२७ ला महाप्रसादाचे वाटप होऊन सांगता होणार आहे.ता.२७ पर्यंत चालणाऱ्या या भावभक्तीपूर्ण सोहळ्यात श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ व किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सद्गुरू सोपानकाका देहूकर फड श्री क्षेत्र पंढरपूर परंपरा लाभलेले पेनटाकळी हे गाव पैनगंगेच्या तिच्यावर दरवर्षी नाम उत्सव साजरा करीत असतो.यावर्षीचे हे १४ वे वर्ष आहे.दैनंंदिन कार्यक्रमात रोज सकाळी ४.०० ते सकाळी ५.०० काकडा भजन, सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० शिवमहापुराण कथा, सायंकाळी ६.०० ते ७.०० श्री हरिपाठ, रात्री ८.३० ते १०.३० नामवंत किर्तनकारांचे श्री हरि किर्तन असे राहणार आहेत.ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज ठाकरे हे आपल्या अमृतमय वाणीतून शिवपुराण कथा सांगणारा आहेत.रोज रात्री होणाऱ्या किर्तनामध्ये ता.२० रोजी रात्री ८.०० ते १०.३० ह.भ.प.किरण महाराज शिंदे , २१ रोजी नगर येथील ह.भ.प.उघडे महाराज,ता.२२ रोजी ह.भ.प.गजानन महाराज काळे (कळंबेश्वर) ह्यांनी आपल्या किर्तन सेवा अर्पण केल्या. ता.२३ रोजी रात्री ह.भ.प.पंजाबराव महाराज बिलारी (साखरखेर्डा) यांनी आपल्या किर्तन यातून प्रबोधन करतांना सांगितले की, हरिनामाचा महिमा एवढा अ�
Discussion about this post