

दौंड शहर,
दिनांक, 23/2/25 रोजी, अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड तालुका व जनकल्याण शहर संघ, लोक कल्याण आधार मंच महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने गौरी लज्जा आरोग्य अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर श्री अशोकराव काळे प्राध्यापक कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अविनाश हराळे साहेब सहसंघटक पुणे जिल्हा दिलावर तांबोळी, माननीय श्री दीपक राव मस्के प्रकल्प अधिकारी व मान्यवरांच्या शुभहस्ते संत गाडगेबाबा महाराज व, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अविनाश हराळे साहेब, आपल्या भाषणामध्ये म्हणाले की संत गाडगेबाबा महाराज स्वच्छता अभियान व पोलीस खात्यातील कायदे विषयी मार्गदर्शन केले, माननीय श्री दीपक राव मस्के साहेब प्रकल्प अधिकारी यांनी संत गाडगेबाबा महाराज जीवनावरील गीत गायले व स्वच्छता अभियान अंतर्गत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे व्याख्याते श्री डॉक्टर अशोकराव काळे यांनी गौरी लज्जा आरोग्य अभियान अंतर्गत महिलांना नैसर्गिक प्रसूर्ती व गरोदरपणी व बाळांत पण व आरोग्य ची घ्यावयाची काळजी अत्यंत महत्त्वाचे आहे हे महिलांना मार्गदर्शन केले ग्रामीण भागामध्ये सिजर चे प्रमाण मोठ्या प्रमाणात होत आहे याबाबत आपण नैसर्गिक प्रसूती याविषयी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे असे ते म्हणाले.काही आरोग्य विषयी समस्या असल्यास फोनवरती संपर्क करावा अशी सूचना देण्यात आल्या, कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ ज्योतीताई मोकळ दौंड तालुका महिला अध्यक्ष यांनी केले कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवरांचे आभार श्री प्रमोद शितोळे तालुका अध्यक्ष यांनी मानले व या कार्यक्रमास जन कल्याण शहर संघ व बचत गटातील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला, सौ ज्योतीताई मोकळ दौंड तालुका महिला अध्यक्ष, शहर अध्यक्ष सौ कौसर सय्यद, श्रीमती बेगम ताई, सौ हेमलता जठार पाटील, सौ सोनल शिंदे सौ प्रतिभा ऊगाडे बचत गटातील अध्यक्ष व सचिव व सर्व महिला भगिनींनी उपस्थितीत होत्या, प्रमुख मान्यवरांची उपस्थिती, पुणे जिल्हा सहसंघटक दिलावर तांबोळी, दौंड तालुका अध्यक्ष श्री प्रमोद शितोळे, शहराध्यक्ष नामदेवराव जठार पाटील, दौंड तालुका संघटक श्री नामदेवराव होले मामा, दौंड तालुका उपाध्यक्ष श्री राजेंद्रजी शेलार, श्री शरद गुणवरे शहर संघटक, श्री दादासाहेब जाधव कोषाध्यक्ष श्री भाऊसाहेब खताळ सहकार विभाग किसनरावजी भागवत, श्री भाऊसाहेब खताळ सहकार विभाग व मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक, जनकल्याण शहर संघ अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड तालुका लोककल्याण आधार मंच महाराष्ट्र राज्य..
Discussion about this post