टेंभू सिंचन योजनेच्या अपुऱ्या कामांबाबत कडेगांव येथील पाणी संघर्ष समितीने 27 ऑगस्ट पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबत पुणे जलसंपदा विभागाकडून पाणी संघर्ष समितीला पुणे येथे चर्चे करिता बोलावण्यात आले होते.मात्र पुण्यात या कार्यालयाकडून व उच्च अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची दखल व चर्चा न करता तुच्छ वागणूक देण्यात आली.त्यामुळे 27 ऑगस्ट पासून कडेगांव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष डी एस देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना डी एस देशमुख म्हणाले , टेंभू योजनेचे पाणी कडेगाव व गायकवाड तलावात बंदिस्त पाईप लाईनने मिळावे व टेंभू योजनेने लेखी दिलेले आश्वासनाबाबत शासनाकडून जलद कार्यवाही व्हावी.
तसेच कडेगाव शहरातून कडेपूरला जाणार्या कॅनॉलला बंदिस्त पाईप लाईन टाकावी.शिवाजी नगर तलावातुन 9 नंबर पोट कालव्यातून माळवाडीला बंदिस्त पाईपलांना पाणी मिळावे.सुर्ली व कामथी आवर्तन ज्यादा शक्तीचे पंप बसवून व यांत्रिक डिझाईन करून दोन्ही आवर्तने एकाच वेळी सुरु करावीत.
नेर्ली,अपशिंगे, शाळगाव,बोंबाळवाडी, कोतवडे,खंबाळे औध यासह डोंगरी भागातील गावांना टेंभू योजनेचे पाणी बंदिस्त पाईपलांनी पाणीपुरवठा व्हावा.तसेच पाणी वाटप समान करावे.कडेगाव शहरातील नागरिकांना पिण्यासाठी व खर्चासाठी उन्हाळ्यात पुरेसे व शुद्ध पाणी देणेची व्यवस्था करावी.
सुर्ली व कामथी कॅनॉलचे 2020 साली निकृष्ट दर्जाचे झालेले अस्तरीकरण या भ्रस्टाचार झालेल्या कामाची चौकशी करावी यासह आदी मागण्यांबाबत 26 ऑगस्ट पर्यंत कार्यवाही व्हावी अन्यथा 27 ऑगस्ट आमरण उपोषण सुरू केले जाणार आहे. पाणी संघर्ष समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Discussion about this post