दिल्लीत पार पडलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शरद चंद्र कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाने आपली वेगळी छाप पडली. महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रा. हनुमंत हांडे उत्तम चित्रकार व रसिक म्हणून गौरवले गेले, तर डॉ. मारुती शिंदे यांच्या हृदयस्पर्शी कवितांना रसिकांची विशेष दाद मिळाली.
संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी स्वागताध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांना प्रा. हंडे आणि डॉ. शिंदे यांनी कुंचल्यातून साकारलेले देखणे स्केच भेट दिले. हा क्षण संमेलनात उपस्थित साहित्य, कला आणि संस्कृती प्रेमी यांसाठी संस्मरणीय ठरला.
संमेलनात मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या जतनावर महत्त्वपूर्ण चर्चा झाली, ज्यामध्ये प्रा. हांडे आणि डॉ. शिंदे यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या सहभागामुळे महाविद्यालयाच्या गुणवत्तेचा राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटला आहे. या संधीसाठी महाविद्यालयाचे सचिव प्रा. रवींद्र चव्हाण, प्राचार्य डॉ. हरिबाबू, उपप्राचार्य, डॉ. श्याम पाटील आणि अन्य मान्यवरांचे प्रा. हांडे व डॉ. शिंदे यांनी आभार मानले. या गौरवामुळे संपूर्ण महाविद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
अ.वि.पवार होटाळकर…….
Discussion about this post