
रांजणगाव गणपती,
प्रतिनिधी : बाळासाहेब कुंभार..
संपूर्ण महाराष्ट्र मध्ये नावाजलेले पुणे जिल्ह्यातील शिवभक्तांचे आराध्य दैवत असलेल्या शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथील सोमेश्वर महाराज यांच्या यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे.
दिनांक 26 रोजी महाशिवरात्रीनिमित्त पुणे येथून 45 किमी अंतरावर असलेले व शिरूर येथून 24 किमी अंतरावर असलेल्या सोमेश्वर महाराज यांचे मंदिर पिंपरी दुमाला या ठिकाणी असून महाशिवरात्रीच्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते.
पाच पांडवकालीन स्थापित हेमाडपंथी हे मंदिरा गेले अनेक दशकांपासून या मंदिराची यात्रा मोठ्या दिमाखात भरते.या मंदिराच्या देवस्थान ट्रस्ट अध्यक्षपदी सुनील सोनवणे तर उपाध्यक्ष कैलास पिंगळे खजिनदार म्हणून शेखर पाटेकर तर कार्याध्यक्ष अभिषेक शेळके सचिव डॉक्टर श्रीकांत सोनवणे देवस्थान ट्रस्ट कैलास बडदे सह बांधकाम समिती अरुण कळसकर हे कार्यरत असून यात्रेच्या सात दिवस अगोदर कीर्तन सोहळा अर्थात सप्ताह आयोजन केले जाते.सोमेश्वर महाराजांच्या पालखी जुने ग्रामपंचायत पिंपरी दुमाला येथून निघते. अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये ढोल ताशांच्या व शिवभक्तांच्या घोषणामध्ये पालखी सोमेश्वर मंदिर येथे भक्तिमय वातावरणामध्ये पोहोचते.महाशिवरात्रीच्या मध्यरात्री परवाला सुरुवात होताच अभिषेक करून दर्शनासाठी सुरुवात होते.
विशेषता करून महाशिवरात्रीनिमित्त यावर्षी सोमेश्वर जीर्णोद्धार झाल्यामुळे भक्तांची पावले मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी पिंपरी दुमाला येथे येण्याचे बोलले जात आहे. दिनांक 26 रोजी महाशिवरात्रीनिमित्त भाविक भक्तांसाठी देवस्थान कडून मोठ्या प्रमाणात फराळाचे आयोजन केले असून भाविकांना पिण्यासाठी पाणी उन्हापासून भाविकांना बचाव होण्यासाठी मंडप टाकण्यात आला आहे. दिनांक 26 रोजी भव्य बैलगाड्यांच्या शर्यती आयोजित करण्यात आले असून त्यामध्ये प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ असे अनेक पद्धतीचे इनाम ठेवण्यात आले आहे. सोमेश्वर देवस्थान व ग्रामस्थ यांनी मोठ्या प्रमाणावर बक्षीसांचा वर्षाव केला आहे.यात्रेनिमित्त सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट निर्मल ग्रामपंचायत पिंपरी दुमाला यांच्या वतीने विविध उपाययोजना केलेल्या असून दोन्हीही महत्वाच्या संस्थांच्या वतीने वाहतुकीसाठी पार्किंगची सुविधा त्याचप्रमाणे रोडच्या कडेच मुरमीकरण रस्ता रुंदीकरण संपूर्ण लाईट व्यवस्था करण्यात आले आहे. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट समस्त ग्रामस्थ पिंपरी दुमाला यांच्या माध्यमातून जंगी कुस्त्यांचा नामांकित आखाडा तसेच मनोरंजनासाठी ऑर्केस्ट्रा चा कार्यक्रम आयोजित करून कार्यक्रमाची सांगता करण्याची सुंदर नियोजन करण्यात आले आहे..
Discussion about this post