येत्या दि. ७ मार्चला होणार निवड; दि. २८ फेब्रुवारीला अर्ज दाखल करता येणार..
अर्धापूर/ प्रतिनिधी,
अर्धापूर नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदासाठी..
पोटनिवडयुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दि २८ फेब्रुवारीला दाखल करता येणार आहे. दि.५ मार्च रोजी अर्ज मागे घेता येतील. तर दि. ७ मार्च रोजी सकाळी १२ वाजता नगराध्यक्षपयची निवड होणार आहे.
विद्यमान नगराध्यक्ष छत्रपती कानोडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यामुळे रिक्त झालेल्या नगराध्यक्ष
पाचा पोटनिवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जाहीर केला आहे. नगराध्यक्षपदाची पोटनिवडणूक दि. ७ मार्च रोजी नगर पंचायत सभागृहात घेण्यात येणार आहे. त्यानुसार दि. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपपर्यंत अर्ज घेणे व भरणे, त्याच दिवशी दुपारी २ नंतर अर्ज छाननी तर सायंकाळी ५ पर्यंत जे अर्ज फेटाळण्यात आले आहेत, त्या उमेदवारांची नावे आणि कारणे सुचना फलकावर प्रसिध्द होतील. दि. ५ मार्च रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत
उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. दि. मार्च रोजी सकाळी ११ वाजता मतदान प्रक्रिया सुरू होणार असून त्यानंतर नगराध्यक्षपदाच्या निवडीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
अर्धापूर नगरपंचायत सभागृहात ही निवड प्रक्रिया होणार असून नगराध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेसाठी उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ यांना पिठासीन अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली. एकूण १७
नगरसेवकांचे संख्याबळ असलेल्या या नगरपंचायतीवर माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या समर्थकांचे वर्चस्व आहे. त्यांच्या शहर विकास आघाडीचे 11. आणि भाजप २ असे एकूण १३ नगरसेवक सत्तापक्षाकडे असल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. नगराध्यक्षपदासाठी अशोक चव्हाण यांचे विश्वासू म्हणून ज्येष्ठ नगरसेवक सोनाजी सरोदे यांच्यासह इतरांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय खा. अशोकराव चव्हाण हेच घेतील..
Discussion about this post