
उदगीर (श्रीधर सावळे )चंद्रपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल महाराष्ट्र स्त्रीरोग संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण परिषदेत उदगीर स्त्री रोग संघटनेला राज्यातील सर्वोत्कृष्ट स्त्री रोग तज्ञ संघटना म्हणून गौरविण्यात आले आहे. तसेच डॉ. प्राजक्ता नितीन गुरुडे उत्कृष्ट स्त्री रोग संघटना प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.चंद्रपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल महाराष्ट्र स्त्रीरोग संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण परिषदेत अखिल भारतीय स्त्री रोग संघटनेच्या अध्यक्षा डॉ.सुनिता तांदूळवाडकर, महाराष्ट्र स्त्री रोग संघटनेचे अध्यक्ष डॉ.किरण कुर्तकोटी, सचिव डॉ.बिपिन पंडित, परिषदेच्या अध्यक्षा डॉ.मनीषा घाटे, परिषदेच्या सचिव डॉ.कल्पना गुलवाडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या परिषदेत उदगीर स्त्री रोग तज्ञ संघटनेस राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या तुलनेत उत्कृष्ट आरोग्य सेवा व उपक्रम राबविल्याबद्दल प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. प्राजक्ता नितीन गुरुडे यांना आरोग्य तसेच विविध आरोग्य विषयक उपक्रम राबविल्याबद्दल सामाजिक कार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ.सविता पदातुरे यांना युवा पुरस्कार तर ज्येष्ठ स्त्री रोग वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ.सुप्रिया जगताप तसेच माहेर मॅटनिटी या हॉस्पिटल द्वारे सर्वसामान्य गोरगरीब महिलांना कर्करोग संदर्भातील व वंध्यत्व निवारण यात अतिशय मौलिक कार्य केलेल्या डॉ.प्राजक्ता नितीन गुरुडे यांना स्त्रीरोग संघटनेसाठी राष्ट्रीय पातळीवर केलेल्या कार्याबद्दल विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ग्रामीण भागातील सर्वच क्षेत्रात भारतीय स्त्री रोग संघटना पोहोचवून तळागाळातील स्त्रियांच्या आरोग्य विषयक समस्या सोडविण्यासाठी डॉ. प्राजक्ता नितीन गुरुडे व उदगीर स्त्री रोग संघटनेने यांनी अतिशय मौलिक कार्य केले आहे, व अद्यापही त्यांचे हे कार्य अख़ंडीतपणे सुरूच आहे. डॉ.प्राजक्ता नितीन गुरुडे यांनी महिलांच्या आरोग्यविषयक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक परिषदांना उपस्थिती नोंदवून त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचे काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र स्त्री रोग संघटनेच्या वतीने त्यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. उदगीर स्त्री रोग संघटनेच्या अध्यक्षा डॉ.सविता पदातुरे, डॉ.सुप्रिया जगताप, सचिव डॉ. प्राजक्ता नितीन गुरुडे व कोषाध्यक्षासह सर्व महिला डॉक्टर, उपाध्यक्षा, सहसचिव, वरिष्ठ पदाधिकारी, पदाधिकारी सदस्या यांच्या कुशल नेतृत्वात उदगीर स्त्री रोग संघटनेस हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल स्त्री रोग तज्ञ संघटनेस शहरातील व तालुक्यातील स्त्री रोग तज्ञ महिला डॉक्टर व पुरुष डॉक्टर तज्ञांनी सत्कार मूर्तींचे अभिनंदन केले आहे. विशेष म्हणजे माहेर मॅटनिटी हॉस्पिटल अंतर्गत स्त्री वंध्यत्व पासून ते स्त्रीच्या सुखरूप प्रसूती व बाळंतपणासाठी, प्रसूतीसाठी सतत रात्रंदिवस कार्यरत असणाऱ्या तसेच कॅन्सर सारखा आजाराला विना शु:ल्क व मोफत महिलांवर उपचार करणाऱ्या प्रसिद्ध व ख्यातनाम अशा डॉ.प्राजक्ता नितीन गुरुडे ह्या सामाजिक क्षेत्रात सतत कार्यरत असतात. तसेच २०२४-२५ या वर्षात उदगीर स्त्रीरोग संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रीय परिषद, स्त्री रोग विषयक कार्यशाळा व विविध सामाजिक कार्य, शाळा व महाविद्यालयात जाऊन मुलींना आरोग्यविषयक मार्गदर्शन करणे, एचपीव्ही व्हॅक्सिनेशन, व्याख्यान, एचपीव्ही संदर्भात समुपदेशन करणे व महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर घेणे असे विविध कार्यक्रम या वर्षात घेण्यात आले. या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र स्त्रीरोग संघटनेने हा पुरस्कार दिला आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Discussion about this post