उदगीर /कमलाकर मुळे:
प्रयागराज हा आपण जाणतो तो त्रिवेणी संगम साठी आणि या वर्षी तिथे भरला तो भूतो न भविष्यती असा कुंभ मेळा..
साहजिक आपल्यासारख्या सामान्य माणसाला उत्सुकता लागली ती कुंभ मेळा पाहण्याची आणि तिथे स्नान करण्याची,पण हे स्वप्न म्हणा की संकल्प शिव धनुष्य पेलण्यापेक्षा कमी नव्हे.
कधी,कुठे आणि कसे हे प्रश्न घेऊन जायचे आणि अनुभव घेऊन यायचे.
आणि यामध्ये दुवा बनण्याचे कार्य केले ते सचिन याने..
योगायोग असेल असे वाटावे पण मी म्हणेन तो कौल होता आपल्यासाठी की आपल्या ग्रामीण भागातील वाढवणं या गावातील एक तरुण तिथे शिक्षणासाठी प्रयागराज येथे जातो आणि नेमका त्या काळात कुंभ मेळा तिथे होतो.
आपल्या भागातील लोकांसाठी ते खरच त्रिवेणी संगम पेक्षा कमी नाही.
सुरुवातीला सचिन याने आवाहन केले की मी आहे येथे तुमच्यासाठी हक्काचे घर म्हणून आणि पाहता पाहता शेकडो लोकांनी त्या तरुणाला साकडं घालावं.
प्रथम दर्शनी खूप रोमांचक वाटणारं हे सगळं मात्र पुढे आवाहन वाटावे एवढे अवघड व्हावे एवढे.
दिवस असे की रात्र फोन वाजत राहावे आणि हा तरुण पुरता या कामासाठी झपाटून गेला.
एक नव्हे तर शेकडो लोकांना राहण्यापासून ते स्नान करण्यापर्यंत वाटा काढून देत हे आवाहन लीलया पार केलं.
आज या कुंभ मेळ्याची सांगता म्हणून हा ऋण निर्देश करण्याचा प्रपंच..
जिंकलास मित्रा तू आम्हाला..
आम्ही एक पवित्र स्नान आम्ही करून धन्य झालो असलो तरी तू मात्र या शेकडो स्नानाचे पुण्य कमावले..
Discussion about this post