धारूर तालुक्यात ड्रोन कॅमेऱ्यांचा धुमाकूळ
धारूर तालुक्यातील गावंदरा आंबेवडगाव चोंडी सोनीमोहा जागीरमोहा अशा अनेक परिसरात आज गुरूवार दि. २२ऑगस्ट रोजी रात्री 9: 30वा. दरम्यान ड्रोन ने घिरट्या घातल्याचे नागरिकांनी पाहिले.
त्याचा काही लोकांनी मोबाईल कॅमेर्यात व्हिडिओ देखील काढला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धारूर तालुक्यातील अनेक ठिकाणी आकाशात ड्रोन घिरट्या घालत असल्याचे काही नागरिकांनी पाहिले तसेच संबंधित ड्रोनचा व्हिडिओ देखील काही लोकांनी केले आहे. हा फोटो सोशल मीडियावर वारं होत असल्याने व नागरिकांनी स्वतःहून पाहिल्यामुळे ग्रामीण भागात भीटीचे वातावरण निर्माण झाले आहे .

Discussion about this post