




पालघर जिल्हा प्रतिनिधीकडून : योगेश कदम .
तिळसे, बुधवार, दि. २६ फेब्रुवारी : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील तिळसे या ठिकाणी सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री तिळसेश्वर मंदिरात भाविकांची तुफान गर्दी झाली होती. आज सकाळपासूनच महादेवाचे अनेक भक्तगण दर्शनासाठी मोठ्या श्रद्धेने रांगा लावून दर्शन घेत होते. या सोहळ्याला भव्यदिव्य अशा यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. हर हर महादेवच्या गर्जनेने सारे वातावरण शिवमय झाले होते. कलिंगड, खजूर, खाऊ व पिपाण्यांच्या आवाजाने सारे वातावरण सजून गेले होते. लहान मुलांपासून ते थेट आबाळवृद्धांपर्यंत साऱ्यांचा त्यात समावेश होता.
Discussion about this post