
काव्य पुष्पांजली मंडळ टेंभुर्णी ता. माढा जि. सोलापूर संचलित 'मायबाप स्मृती साहित्य पुरस्कार' सोहळा रविवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी टेंभुर्णी ता. माढा जि. सोलापूर येथे संपन्न झाला. यावेळी कवी नारायण खरात यांच्या "हेही दिवस जातील" या काव्यसंग्रहासाठीचा मायबाप स्मृती साहित्य पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. रोख रक्कम, सन्मानपत्र, सन्मान चिन्ह, शाल श्रीफळ व पुष्पहाराने यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी काव्यपुष्पांजली मंडळाचे सर्वेसर्वा प्रसिद्ध साहित्यिक हरिश्चंद्र पाटील, भास्कर सोनवणे, दत्तात्रय भुजबळ, पंडित वाघावकर, प्रसिद्ध साहित्यिक मुकुंदराज कुलकर्णी, विजय जाधव व अनेक मान्यवर साहित्यिक यावेळी उपस्थित होते. त्यांच्या या यशाबद्दल मा.आरोग्यमंत्री , मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेश भैय्या टोपे साहेब, डॉ. मारुती घुगे, श्री राजेभाऊ कंटुले,अशोक डोरले, दिपक राखुंडे, कन्नुलाल विठोरे, संतोष जोशी, शरद साबळे, व सर्व मित्र परिवार यांनी अभिनंदन केले आहे.
Discussion about this post