
मारेगाव :
तालुक्यातील नवरगांव (धरण) येथे तुळशी माता मंदिर असुन दरवर्षी महाशिवरात्री पासुन या ठीकाणी यात्रा भरते. या वर्षीही श्री क्षेत्र तुळशी वृंदावन देवस्थान नवरगांव र.नं.ए.३९२ येथे 26 फेब्रुवारी ते 08 मार्च 2025 पर्यंत यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मारेगाव तालुक्यातील नवरगांवच्या एका टोकाला नृसिंह मंदिर (हेमाडपंथी) असुन ब-याच जुन्या दगडीमुर्ती आहेत. तसेच गावाच्या मध्यभागी शिवालय असुन गावापासुन एक फर्लांग अंतरावर तुळशी वृंदावन देवस्थान आहे. या देवस्थानाचा उदय १९४९ साली महाशिवरात्री पासुन झाल्याचे सांगीतले जात असून मारेगाव तालुक्यातील तपोभुमि असल्याचे सानले जाते. देवस्थान परीसरात
तिर्थक्षेत्र विकास निधी मधुन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भव्य समागृह, बगीच्याचे कंम्पाऊंड, पुर्ण परीसर विद्युतीकरण, प्रशस्त निवास, संरक्षण भिंत ही विकास कामे झाले आहेत. दहीहांडी माळा, पाकगृह व कार्यालय, विश्राम गृह बांधकाम प्रस्तावित आहे. 26 फेब्रुवारी रोजी घटस्थापना, 4 मार्च रोजी दुपारी १ वाजता गोपाल काला, तथा 08 मार्च 2025 रोजी पाखडपुजा व घट विसर्जन तसेच भव्य यात्रा महोत्सव निमित्त शंकर पट शंकरपटाचे उद्घाटन दि. 5.6.व 7 मार्च 2025 करण्यात येणार आहे असल्याची माहीती देवस्थान कमेटीचे अध्यक्ष.रमेश गाऊत्रे, उपाध्यक्ष आनंद वाळके, सचिव विलास नक्षणे, विश्वस्त , अरुण नक्षणे, अफजल खान पठाण, गणेश नैताम, नानाजी डाखरे, अरुण बोधाने, संजय मुन, यांनी दिली..
Discussion about this post