(मुकुंद आसाराम गायकवाड पाथर्डी तालुका प्रतिनिधी )
- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि संत वामनभाऊ विद्यालय वडूले ता.शेवगाव यांचे संयुक्त विद्यमाने डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या ११ व्या स्मृतिदिनानिमित्त पुस्तके वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
- केवळ रस्त्यावर उतरून परीवर्तन घडणारं नाही,हे ओळखून डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी समाजाला विवेकाच्या मार्गांवरून घेऊन जाण्यासाठी त्यांच्यातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी जी पुस्तके लिहिली ,त्याच विचारांची प्रेरणा घेऊन त्यांचे विचार पूस्तक रूपाने घरोघरी पोहोचविण्याचा संकल्प महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.यातून नवीं पिढी विज्ञाननिष्ठ घडविण्यासाठी या पुस्तकाचे वितरण आम्ही करत आहोत.या पुढे आपला सर्वांचा सक्रिय सहभाग आम्हाला हवा आहे.असे आवाहन अंनिस चे कार्यकर्ते विष्णू गायकवाड यांनी केले.यावेळी त्यांनी चमत्कारांचे प्रात्यक्षिके करून विद्यार्थ्यांना मंत्र मुग्ध केलें.
- कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक किसन चव्हाण हे होते.तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जगत मित्र अभिजित दगडखैर ,विक्रम फुंदे, अरूण बोरूडे , शैलजा सोनवणे, महादेव मगरे, गणेश वाणी,अमर घुले आदी मान्यवर उपस्थित होते.
- कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब मोरे यांनी केले.
- कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुसे बाळासाहेब यांनी केले.
- कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बापूराव भूसारी, श्रीधर डोळस, ज्ञानेश्वर भिटे आदींनी विशेष प्रयत्न केले.
- आभार संजय धमाल यांनी मानले.
Discussion about this post