शिरूर तालुका प्रतिनिधी-
शिरूर तालुका खरेदी-विक्री संघाच्या संचालक पदी प्रतिष्ठित व अनुभवी व्यक्तिमत्व मा. शरदनाना कालेवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे. संघाच्या निवडणुकीत कालेवार यांना सर्वसामान्य सभासद व सहकाऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळाला. त्यांचे अनुभवसंपन्न नेतृत्व आणि संघाच्या हितासाठी घेतलेले निर्णय यामुळे त्यांच्यावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. संघाच्या उत्कर्षासाठी ते नवे उपक्रम राबवतील आणि शेतकरी, व्यापारी व सर्व संबंधित घटकांना अधिक लाभ मिळवून देतील, अशी अपेक्षा आहे. त्यांच्या या निवडीबद्दल विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Discussion about this post