उदगीर /कमलाकर मुळे: मागच्या काही दशकापासून कथा कादंबऱ्या चित्रपटाद्वारे वाड्यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे षडयंत्र रचले गेले आहे. त्याला उत्तर देण्यासाठी पहिले राज्यस्तरीय गावगाडा साहित्य संमेलन तालुक्यातील तादलापूर येथील पाटलांच्या वाड्यात भरविण्यात येणार आहे. माय मराठी ,अरुणा प्रकाशन आणि निसर्ग मंडळाच्या संयुक्त विद्यमाने पार पडणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध गांधीवादी विचारवंत सिद्धहस्त लेखक तथा वक्ते प्राध्यापक मॅक्सवेल लोपीस राहणार असून, संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडीने सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवशटवार यांच्या शुभ हस्ते होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन अमूर्त संस्कृती संचिताचे संशोधक डॉक्टर साहेब खंदारे यांच्या हस्ते होणार आहे .यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लातूर जि.प. चे माजी अध्यक्ष पंडितराव धुमाळ ,सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर अनिल कांबळे, मसापचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, सोळाव्या अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षा डॉक्टर अंजुम कादरी, प्राचार्य बी. टी .लहाने आणि देवनागरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्यामाप्रसाद धनुरे हे उपस्थित राहणार आहेत. रविवारी दुपारी 12:30 ते 2.00 या वेळेत का गावे?या विषयावर पहिला परिसंवाद होणार, सुप्रसिद्ध साहित्यतिक विचारवंत प्रा.शेषेराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्याया परिसंवादात प्रा.नारायण कांबळे,प्रा.डाॅ.पृथ्वीराज तौर,प्रा.डॉ.दिपक चिद्दरवार आणि तानाजी घोलप हे आपले विचार मांडणार आहेत.
Discussion about this post