स्वारगेट पुणे येथे महिलेवर घडलेल्या अत्याचारातील आरोपीवर बारामतीमध्ये कायदेशीर व कडक कारवाईचे आदेश. बारामती तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या.वतीने आज बारामती पोलीस निरीक्षक श्री.विलास नाळे साहेब यांना.काल स्वारगेट बस स्थानक पुणे येथे २६ वर्षीय महिलेवर आरोपी दत्तात्रय गाडे याने त्या महिलेशी गोड बोलून तिला फसवून एका बाजूला लावलेल्या सांगोला डेपोच्या शिवशाही बसमध्ये एकांतात नेऊन बसचा दरवाजा लावून तिच्यावर निर्गुण पणे अत्याचार केला, तरी ही घटना निंदनीय असून अश्या कृत्यामुळे महिला वर्गात सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे व त्यांच्यामध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले आहे तरी संबंधित गुन्हेगारास लवकरात लवकर अटक करून त्याच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्याचे,निवेदन देण्यात आले …
या प्रसंगी बारामती ता.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला अध्यक्ष वनिता बनकर’ शहराध्यक्ष आरती शेंडगे’ युवती अध्यक्षा प्रियंका शेंडकर’ सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष पैगंबर शेख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार चे जिल्हा सरचिटणीस जयकुमार काळे’सोशल मीडिया जिल्हा सरचिटणीस राणी नवले’ माळेगाव नगरपंचायतचे अध्यक्ष नितीन तावरे’ लीगल सेलच्या अध्यक्षा वृषाली बांदल’ युवक तालुका उपाध्यक्ष विठ्ठल करे’ओबीसी सरचिटणीस माया खुंटे’ कल्पना परगेस’दिपाली पवार शिल्पा शिरवळे’ दैनिक कोकण प्रदेश . सारथी महाराष्ट्राचा प्रतिनिधी अक्षय कांबळे, आदी उपस्थित होते..
Discussion about this post