वणी : येथील श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालित वणी पब्लिक स्कूलमध्ये 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 27 फेब्रुवारी हा दिवस म्हणजे प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक, कवी, कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी त्यांना आदरांजली अर्पण करीत दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन साजरा केल्या जातो.कुसुमाग्रज यांची जयंती तसेच मराठी भाषा गौरव दिवस याचे औचित्य साधून शाळेमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे सचिव मा. ओमप्रकाशजी चचडा सर व संचालक मंडळाचे सदस्य मा. विक्रांतजी चचडा सर यांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला श्री. प्रफुल महारतळे , श्री. सतीश बाविस्कर, श्री. मंगल तेलंग, सौ. अश्लेषा जेणेकर इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते माँ सरस्वती आणि कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविकाद्वारे श्री. सतीश बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा इतिहास, मराठी भाषेतील विविध महान ग्रंथ व कवी यांच्या बद्दल माहिती सांगितली. सौ. प्रणोती खडसे यांनी आपल्या दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर करण्याचे आवाहन केले. कु. वैदेही खडसे या विद्यार्थिनीने मराठी भाषेची थोरवी सुंदर गीताद्वारे गायली. याप्रसंगी विद्यार्थांनी मराठी अभंग, कविता सादर केल्या.आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठी भाषेला अधिकाधिक संपन्न करण्यासाठी व तिच्या समृद्धीसाठी ज्या साहित्यिक महात्म्यांनी आपले जीवन व्यतीत केले. त्यांच्याबद्दल आपण ऋणी असले पाहिजे असे संदेश दिला. तसेच प्रत्येकाने मराठी भाषेतील साहित्याचा अभ्यास करून तिची कीर्ती जगामध्ये दुरवर पसरली पाहिजे असे आवाहन केले.उपरोक्त कार्यक्रमाचे संचालन कु . आशा प्रजापती व गायत्री गुंफेवार यांनी तसेच आभार प्रदर्शन जिगीशा कुडमेथे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यानी सहकार्य केले.
Discussion about this post