शिरूर तालुका प्रतिनिधी:-
छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेचा साक्षात्कार ‘छावा’चित्रपटाचे मोफत प्रदर्शन!
स्वराज्य रक्षक प्रतिष्ठानचा ऐतिहासिक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी सुवर्णसंधी निमगाव म्हाळुंगी (ता.शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य,पराक्रम आणि बलिदानाची गौरवगाथा उलगडून दाखवण्यासाठी ‘छावा’ या ऐतिहासिक चित्रपटाचे मोफत प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. स्वराज्य रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी उपसरपंच,ग्रामपंचायत निमगाव म्हाळुंगीचे तेजस यादव यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. इतिहासाशी नाळ जोडणारा अनोखा उपक्रम शनिवार, १ मार्च २०२५ रोजी स्थानिक चित्रपटगृहात होणाऱ्या या विशेष प्रदर्शनात छत्रपती संभाजी महाराजांचे जीवनकार्य, त्यांचे धाडस, दूरदृष्टी आणि स्वराज्यासाठी दिलेले बलिदान नव्या पिढीसमोर प्रभावीपणे सादर केले जाणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी सुवर्णसंधी या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना इतिहासाची जाणीव होऊन त्यांच्यात स्वाभिमान आणि देशभक्तीची भावना रुजेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
छत्रपती संभाजी महाराज स्वाभिमान आणि बलिदानाचे प्रतीक छत्रपती संभाजी महाराज हे केवळ मराठ्यांचेच नव्हे, तर संपूर्ण हिंदवी स्वराज्याचे रक्षक होते.त्यांचे पराक्रम, बुद्धिमत्ता आणि स्वराज्यासाठी केलेले त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे. समाजहितासाठी स्वराज्य रक्षक प्रतिष्ठानचा स्तुत्य पुढाकार. स्वराज्य रक्षक प्रतिष्ठानतर्फे राबवण्यात येणाऱ्या या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी उपक्रमातून विद्यार्थ्यांना इतिहासाची नव्याने ओळख होईल आणि त्यांना संभाजी महाराजांच्या विचारांचे अनुकरण करण्याची प्रेरणा मिळेल.
छावा केवळ चित्रपट नव्हे, तर ऐतिहासिक पर्वणी हा चित्रपट केवळ मनोरंजन नसून विद्यार्थ्यांसाठी इतिहासाशी नाळ जोडणारा, स्वाभिमान जागवणारा आणि राष्ट्रप्रेमाची भावना वृद्धिंगत करणारा प्रेरणादायी अनुभव ठरणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे जीवनचरित्र पाहण्याची आणि त्यांच्या बलिदानाची प्रेरणा घेण्याची ही सुवर्णसंधी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी नक्कीच अनुभवावी.
Discussion about this post